ब्रेकींग : एमआयडीसी पोलीसांनी उधळला ५५ गुरांच्या कत्तलीचा डाव !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अक्सानगर भागात कत्तलीसाठी आणलेल्या ४० गुरांना सोडविले तर दुसऱ्या घटनेत चोरीची १५ गुरे वाहनात कोंबून कत्तलीसाठी आणताना तीन वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. दोन्ही घटनेत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी एकूण ५५ गुरांचा कत्तलीचा डाव उधळून लावला असून याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण परिसारातील मास्टर कॉलनी, पिरजादे वाडा, अक्सा नगर, मेहरूण या भागात रविवारी २५ जून रोजी सकाळी १० वाजता चोरीची जनावरे कोंबून त्यांची कत्तलीसाठी तीन पीकअप व्हॅन मधून वाहतूक करून मास्टर कॉलनीकडे जात असताना एमआयडीसी पोलीसांनी पकडले. यात १५ गुरांची निर्दयतेने कोंबून वाहतूक करत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी या प्रकरणी शेख राजीक शेख रफिक, शेख रेहान शेख यसूफ (रा.वरणगाव), अदनान कय्युम खान (दत्तनगर, मेहरूण), इफ्तीखार शरीफ खान (मास्टर कॉलनी), सर्फराज रहीम शेख, सैय्यद वाजीद सैय्यम इब्राहीम (रथ चौक), सैय्यद अनीस सैय्यद हमीद या सात जणांना ताब्यात घेतले आहे.

तर दुसऱ्या घटनेत अक्सानगर भागात असरार शेख मुक्तार शेख व त्याचा लहान अल्पवयीन भाऊ हे पत्र्याच्या शेडमध्ये राज्यात गोवंश कत्तल करण्यास प्रतिबंध असतांना सुध्दा कत्तल करताना आढळून आले. तसेच या ठिकाणी चोरी करून आणलेले ४० गुरे कत्तलीसाठी आणून ठेवल्याचे आढळून आले. पोलीसांनी ४० गुरांची सुटका केली. दोन्ही कारवाईत एकूण ५५ गुरांची सुटका करण्यात आली असून, ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, सचीन पाटील, योगेश बारी, इम्रान सैय्यद, किशोर पाटील, किरण पाटील, मंदार पाटील, चेतन पाटील, आशा पांचाळ यांनी केली. या गुन्ह्याच्या तपास दत्तात्रय पोटे हे करीत आहेत. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या ५५ गुरांना कुसुंबा येथील आर.सी.बाफना गो सेवा अनुसंधान गोशाळा येथे ठेवण्यात आले आहे.

Protected Content