तलाठ्याचा अंगावर घातले अवैध वाळूचे ट्रॅक्टर : थोडक्यात वाचले प्राण

यावल  प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील थोरगव्हाण मार्गावर विनापरवाना गौण खनिजची वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करण्यास गेलेल्या तलाठी स्वप्नील तायडे यांच्या अंगावरून  ट्रॅक्टर चालवत त्यांच्या पायास दुखापत केल्याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील मनवेल गाव शिवारातील मनवेल ते थोरगव्हाण मार्गावरील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी आज सोमवार दि.१० मे रोजी सकाळी ८.४० वाजेच्या सुमारास मनवेल येथे तलाठी म्हणुन कार्यरत असलेले स्वप्नील शशीकांत तायडे (वय ३७ वर्ष) हे शासनाच्या आदेशान्वये वाळू वाहतुकदारांवर कारवाई करत असतांना सुभाष सखाराम कोळी (रा.  शिरसाड ) त्याच्या ताब्यातील चालवित असलेले स्वराज कंपनीचे मॉडेल क्रमांक ७३५हे निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर कारवाई करीता थांबविण्याच्या प्रयत्न केले असता या  ट्रॅक्टर चालकांने वाहन न थांबवता अंगावर आणुन डाव्या पायास दुखापत करून तायडे यांना जखमी केले.  संशयित आरोपी हा घटनास्थळावरून ट्रॅक्टर न थांबवता पसार झाला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, स्वप्नील शशीकांत तायडे यांनी यावल पोलीसात सुभाष सखाराम कोळी याच्या विरूद्ध फिर्याद दाखल केल्याने भाग५ गु .र . न .८० / २०२१ भादवी कलम३५३ , ३३२प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशाने पोलीस अमलदार गौरख गंगाराम पाटील हे करीत आहे .

 

Protected Content