बैलाने शिंग मारल्याने जखमी झालेल्या वृध्दाचा उपचरादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बैलाने शिंग मारल्याने जखमी झालेल्या वृध्दाचा उपचरादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत गुरूवार ४ मे रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नामदेव पुंडलिक बारी (वय-६०) रा. शिरसोली ता.जि.जळगाव असे मृत वध्दाचे नाव आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नामदेव बारी हे आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नामदेव बारी यांना बैलाने शिंग मारले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना जळगावातील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गुरूवारी ४ मे रोजी सायंकाळी त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.

Protected Content