Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एक संक्रमित रूग्ण आढळला

कोरोना : जिल्ह्यात आज एक संक्रमित रूग्ण आढळला

0
121


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १ बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर २ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून आज एक बाधीत रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात २२ ॲक्टीव्ह रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६९६ रूग्ण संख्या आढळून आली आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २२ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 


Protected Content

Play sound