जळगाव शहरात घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

जळगाव प्रतिनिधी । गांधी नगर भागात घरफोडी करून सोने, चांदीचा 7 लाख 66 हजार रुपयांच्या ऐवजासह आरोपीला अटक करण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले. आरोपीची कसून चौकशी सुरू असून अजून घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.याबाबत माहिती अशी की, जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील गांधी नगर भागात घरफोडी झाली होती त्यात सोन्याचे दागीने व रोख रक्कम अशी एकुण 7 लाख 66 हजाराचा चोरुन नेली होती.जळगाव शहरात वाढत्या घरफोडी व चोरी पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक निलाभ रोहन यांनी दिलेल्या सुचनेनुसार व पोलीस निरीक्षक अकबर पटेल यानी डिबी कर्मचारचाचे पथक याना त्या अनुशंगाने घरफोडी, चोरी, मो.सा. चोरी गुन्हे उघडकीस आणने बाबत सुचना व मार्गदर्शन केले.त्या अनुशंगाने डी.बी पथकातील पोका छगन तायडे यांचे गुप्त माहितीनुसार पोहेका तुषार जावरे, शेखर जोशी, अजीत पाटील, फिरोज तडवी, जगन सोनवणे, प्रशात पाठक, मंहेद्र बागुल, जितेद्र सुरवाडे, प्रशांत जाधव, अविनाश देवरे, हेमत तायडे असे पथक तयार करून आरोपी मोनुसिंग जगदीशसिंग बावरी रा.शिरसोली नाका तांबापुरा याला अटक केली व त्याच्या ताब्यातील 3 लाख रुपयांची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची चिफ, 30 हजार रुपयांची 5 ग्रॅम वजनाची कानातले सोन्याचे दोन जोड, 18 हजारांची सोन्याचे सहा ग्रॅम वजनाचे मणी मंगळसुत्र, 75 हजाराची पाच ग्रम वजनाच्या पाच अंगठ्या, 36 हजार रुपयांचे 12 ग्रम वजनाचे सोन्याचे पेडल, 5 हजाराचे सोन्याचे दोन तुकडे प्रत्येकी 1 ग्रम वजनाचे, 12 हजार रुपयांची सोन्याच्या प्रत्येकी दोन ग्रम वजनाच्या दोन अंगठ्या, 5 हजाराची सोन्याच्या प्रत्येकी एक ग्रम वजनाच्या दोन वस्तू, 27 हजारांची 9 ग्रम वजनाची सोन्याची पट्टी, 30 हजार रुपये किंमतीची 1 किलो वजनाचे चांदीचे नाणे आणि 20 हजारांचे चादीचे एक ताट तीन ग्लास दोन वाट्या दोन समया दोन अत्तरदाण्यातीन चमचे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Protected Content