शिरसोली येथे तरुणावर धारदार शस्त्राने वार; एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून एकाने शिरसोली येथे राहणाऱ्या तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सायंकाळी बाजारपेठ परिसरातील गणपती मंदिराजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक केली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , विजयगंगाराम गवळी वय २२ रा. ओमनगर शिरसोली हा बाजार पेठे येथे गणपती मंदिराजवळ उभा असताना त्याच्या एका मित्र पद्माकर प्रभाकर धनगर (वय २५) रा बांभोरी ता. धरणगाव ह.मु. शिरसोली याने विजयावर हल्ला केला सोबत शाब्दिक वाद होऊन मित्राने आपल्याजवळील धारदार शास्त्राने त्याच्या पोटावर हल्ला करून पलायन केले .

यावेळी रक्तबंबाळ जखमी अवस्थेत असलेल्या विजयला काही नागरिकांनी त्याच्या पोटाला रुमाल बांधून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले . घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेत आरोपीला अटक केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते . दरम्यान शिरसोली येथे यात्रेसाठी पुण्याहून सुटी घेऊन विजय गवळी हा गावात आल्याचे कळते .

पद्माकर प्रभाकर धनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोहेकॉ जितेंद्र राठोड, राजेंद्र ठाकरे, प्रकाश पाटील, निलेश भावसार यांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पीएसआय राजकुमार ससाने करीत आहे.

Protected Content