चोपडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इन्स्पायर कॅम्पसाठी निवड

chopda satkar

चोपडा, प्रतिनिधी | येथील म.गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील अकरावी विज्ञान वर्गातील प्रथमेश कोठावदे, मयुर पाटील व सचिन भारती या विद्यार्थ्यांची इन्स्पायर कॅम्पसाठी निवड होऊन तिघांनी संगमनेर येथे पाच दिवसीय कॅम्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

 

त्याबद्दल तिघांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश जी. पाटील , सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हुशार विद्यार्थ्यांनी केवळ मेडिकल, इंजिनियरींगचा विचार करिअरसाठी न करता संशोधनाला महत्त्व देऊन शास्त्रज्ञ बनण्याचे ध्येय ठेवावे असे मत संस्थेच्या सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील यांनी मांडले. प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन उपप्राचार्य प्रा.बी.एस. हळपे यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय. पाटील, प्रा.एन.बी. शिरसाठ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content