प.वि.पाटील विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई  सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजून सांगत विद्यार्थ्यांकडून पद्मासन, वज्रासन, मत्स्यासन, मकरासन, भुजंगासन, शवासन इत्यादी आसने प्रात्यक्षिकासह प्रत्यक्ष करून घेतले. आपल्या जीवनामध्ये आपण योगाचे महत्त्व जाणून नियमित योगासने केल्यास आपण विविध आजारांना सहजतेने हरवू शकतो तसेच एक सदृढ जीवन आपण जगू शकतो असे मार्गदर्शन मुख्याध्यापिका धनश्री फालक यांनी यावेळी केले.

 

योगशिक्षिका चित्रा महाजन तसेच कल्पना भावसार यांच्या समूहाने विद्यार्थ्यांकडून विविध आसने योग्य पद्धतीने करून घेतली त्यासाठी उपशिक्षिका कल्पना तायडे,स्वाती पाटील तसेच कायनात तडवी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रसंगी  सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content