आयोध्या नगरातून व्यापाऱ्याची दुचाकी लांबवली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आयोध्या नगर येथील होंडा शोरूम समोरून व्यापाऱ्याची दुचाकी लांबविली. याप्रकरणी  एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळ परिसरातील त्रंबक नगर येथे राकेश निंबा तमखाने (वय-३७) हे वास्तव्यास आहेत. २१मे रोजी त्यांचा मित्र महेश यशवंत बोंडे रा. किसनराव नगर हे राकेश तमखाने यांची (एमएच १९ एटी ५४६६) या क्रमांकाची दुचाकी घेवून गेले होते.  कामानिमित्ताने महेश बोंडे हे आयोध्या नगरातील आस्टर होंडा शोरूम परिसरात गेले होते. या ठिकाणी त्यांनी त्यांच्याकडील दुचाकी होंडा शोरूमच्या समोर उभी केली. काम आटोपून  परतल्यावर त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही त्यांना दुचाकी मिळून आली नाही. याबाबत त्यांनी दुचाकी चे मालक राकेश तमखाने यांना कळवले. १० दिवस उलटूनही दुचाकी मिळून न आल्याने राकेश तमखाने यांनी याप्रकरणी बुधवार १ जून रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे हे करीत आहेत.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!