कोरोनाशी संघर्षाला यश ; जिल्ह्यात आज ४८ नवे रुग्ण

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने दिलेल्या कोवीड अहवालात दिवसभरात जिल्ह्यात ४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे तर ११९  रूग्ण बरे होवून घरी परतले. तर आजच दिवभरात एका रूग्णाचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

 

जळगाव शहर- १० , जळगाव ग्रामीण-५ , भुसावळ-०, अमळनेर-२ , चोपडा-२ , पाचोरा-२ , भडगाव-२ , धरणगाव-० , यावल-३, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर-१, पारोळा-३, चाळीसगाव-१६ ,  मुक्ताईनगर-०, बोदवड- ० असे एकुण ४८  बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

 

 

जिल्हाभरात आजच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत एकुण १  लाख ४१ हजार ८८६  बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १  लाख ३७ हजार ८८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १  हजार ४३४  रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान आज दिवसभरात जळगाव ग्रामीणमधील   एका बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Protected Content