सलीमभाई अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठावान शिवसैनिक ; मतांसाठी बदनामी वेदनादायी – तौसीफ पटेल

patel dharangaon

धरणगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदार संघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचार सभेत चुकीची माहिती देवून दिवंगत व्यक्तीची बदनामी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. माझे वडील सलीमभाई पटेल हे अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठावान शिवसैनिक होते. त्यामुळे मतांसाठी त्यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर प्रचंड वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया तौसीफ पटेल यांनी दिली आहे. असले प्रकार तत्काळ थांबवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. सलीम पटेल यांचे पुत्र तौसीफ पटेल यांनी या संदर्भात आज ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले की, अत्तरदे यांच्या प्रचार सभांमध्ये जानकीराम पाटील आणि जळकेकर महाराज यांनी व्यासपीठावरून असा उल्लेख केला होता की, आज जर सलीमभाई पटेल हयात असते तर ते ही अत्तरदे यांच्या बाजूने मैदानात असते. मात्र त्यांनी केलेला हा दावा धादांत खोटा असून मतदार संघातील सगळ्या जनतेला माहित आहे की, सलीमभाई पटेल हे कट्टर शिवसैनिक होते, ते कधीच शिवसेना सोडून दुसरीकडे जाऊ शकत नव्हते. विरोधक आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी असे चुकीचे दावे करून त्यांची बदनामी करीत आहेत. त्यामुळे त्यांचे आप्तस्वकीय म्हणून आम्हाला याचा प्रचंड मानसिक त्रास होत आहे. विरोधकांनी त्यांच्याबद्दल चुकीची विधाने करून संभ्रम व गैसमज निर्माण करणे थांबवावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Protected Content