पोलिसांच्या आडून हल्ले करू नका : राऊतांचा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मर्द असाल तर समोर या, पोलिसांच्या आडून लढू नका असा इशारा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला आहे.

ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष नव्याने उफाळून आला आहे. काल रात्री ठाण्यामध्ये दोन्ही गटात तुफान राडा झाला. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना भाष्य केले. ते म्हणाले की, हे काही ठिकाणी ठाण्यातच चाललंय. या गटाचं अस्तित्व ठाण्यातच आहे. हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवणार्‍यांचं काम नाही. मर्द असाल तर समोर या. पोलिसांच्या आडून हल्ले करू नका. हे फक्त ठाण्यापुरतंच चाललंय. ठाण्याबाहेर काही नाही. पण लवकरच तेही संपेल.

राऊत पुढे म्हणाले की, भाजपा तुमचा वापर करतोय, हे तुम्हाला भविष्यात कळेल की तुम्ही किती मोठी चूक केली आहे. पोलिसांचा वापर करून जर तुम्ही शिवसैनिकांना ताब्यात घेत असाल, तर ते मुख्यमंत्रीपदाला शोभणारं नाही.

Protected Content