पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था तथा पाचोरा तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्थेच्या शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,  पाचोरा  येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात २१ जून रोजी पहाटे ६ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्य साधून पाचोरा कोर्टाचे प्रथम न्यायदंडाधिकारी जी. बी. औंधकर,  पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांचे योगाचे महत्त्व विशद करणारे समयोचित भाषणे झालीत. या कार्यक्रमात बीज मंत्रासह सूर्यनमस्कार त्यासोबतच शयन स्थिती, विपरीत शयन स्थिती, बैठक स्थिती व दंड स्थितीतील निवडक आसनांचा अभ्यास करण्यात आला. प्राणायामानंतर प्रार्थनेने योगवर्गाचा समारोप करण्यात आला.  सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयात कार्यरत प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी योगशिक्षक म्हणून प्रात्यक्षिके दाखवली.

 

या कार्यक्रमासाठी पाचोरा कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जी. बी. औंधकर,  न्यायाधीश श्रीमती एम. जी. हिवराळे, न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, पाचोरा विधी संघाचे सर्व पदाधिकारी, बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ॲड. मंगेश गायकवाड, सचिव ॲड. राजेंद्र पाटील, ॲड. सुरेश माहेश्वरी, ॲड. एस. पी. पाटील, डी. आर. पाटील, बार कौन्सिलचे सदस्य वकील बंधू – भगिनी, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी दिपक (आबा) पाटील, त्यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील,  कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एस. एस. पाटील, वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आर. बी. वळवी, पाचोरा तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, प्रा. डॉ श्रावण तडवी, प्रा. स्वप्निल भोसले, शांताराम चौधरी, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, ग्रंथालय विभाग तथा शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content