राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या तीघा खेळाडूंची निवड

WhatsApp Image 2019 04 05 at 12.10.38 PM

जळगाव (प्रतिनिधी) ज्युनिअरक्स गर्ल्स (१७ वर्षा खालील)राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्या फुटबॉल असोसिएशनच्या भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या कृषा विनोद बुला,  शीतल सुरेश सहानी,  वैष्णवी राकेश कोष्टी यांची निवड झाली आहे.

 

या निवड झालेल्यांची कूपरेंज फुटबॉल ग्राउंड मुंबई येथे ६ एप्रिलपासून कॅम्प असून अंतिम संघ निवडून १० एप्रिलपासून कोल्हापूर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाणार आहे. आज त्यांना फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूक शेख, जैन स्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे व प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांनी शुभेच्या दिल्या. क्रीडा शिक्षक संधिया बंसोड सह इम्तियाज शेख,प्रो डॉ अनिता कोल्हे,जफर शेख,ताहेर शेख,शेखर देशमुख,नित्यानंद पाटील यांनी सुद्धा अभिनंदन केले.

Add Comment

Protected Content