दुकानाच्या ईलेक्ट्रीक मीटरची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट मधील एका व्यवसायिकाच्या दुकानाचे इलेक्ट्रिक मीटरचे चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात बुधवार २२ मार्च रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेखा प्रमोद बऱ्हाटे (वय-५२) रा. सुर्या अपार्टमेंट, पिंप्राळा जळगाव यांचे जळगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथे दुकान आहे. या दुकानात खाजगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या ६ महिन्यांपासून दुकानावर ईलेक्ट्री बिल येत नाही म्हणून त्यांनी ईलेक्ट्रीक मीटर रूममध्ये जावून पाहणी केली असता त्यांना मिटर दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी महावितरण कंपनीत जाऊन चौकशी केली. त्यावर अधिकारी यांनी तुमचे मीटर आम्ही काढलेले नाही ते जागेवरच असेल असे सांगितले. त्यावरून ईलेक्ट्रीक मीटर चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेखा बऱ्हाटे यांनी बुधवार २२ मार्च रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.  त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञान चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.

Protected Content