अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील कन्नड रोडवरील रांजणगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर गुरूवार ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक सिताराम चौधरी वय ५५ रा. दक्षता नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १९ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता ते दुचाकीने चाळीसगावकडून कन्नड घाटात जात असतांना रांजणगाव फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अशोक चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी चौकशी अंती अखेर गुरूवार ९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे हे करीत आहे.

Protected Content