फोन पेवरून लाच घेतली; सायबर पथकाने केला पर्दाफाश

हिंगोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डिजिटल पेंमेटने लाच घेण्याचा प्रकार हिंगोली जिल्हयातून समोर आला आहे. हिंगोली पोलिसांच्या सायबर पथकाने एका पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, हिंगोली येथील पोलिस कर्मचारी दीपक पाटील याने फिर्यादी विनायक बेंगाळ याला सापडलेला मोबाईल घेऊन कार्यालयात बोलावले होते. कार्यालयात आल्यानंतर बेंगाळ याला सापडलेला मोबाईल जप्त करण्यात आला. त्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस कर्मचारी यांनी बेंगाळकडून बीस हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर पाच हजार रूपये देण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार विनायक बेंगाळ याने पोलिस कर्मचारी दीपक पाटील यांना पाच हजार रूपये फोन पे या डिजिटल पेमेंट ॲप व्दारे लाच पाठवली होती. या घटनेनंतर फिर्यादी विनायक बेंगाळ याने घटनेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यानुसार पोलिस कर्मचारी दीपक पाटील यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content