शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी घेतली पटसंख्या वाढीसाठी बैठक

download 13

जळगाव (प्रतिनिधी) आज शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढावी यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

 

जिल्हा परिषद शाळांमधून वाढणारी विध्यर्थ्यांची चिंताजनक गळतीचे प्रमाण पाहता शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे यांनी बैठकीचे आयोजन करून पटसंख्या वाढीबाबत विविध सूचना केल्यात. यावेळी ज़िल्हा परिषद शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा जसे शालेय पोषण आहार, बालक मेळावा, पालक मेळावा, मुख्याध्यापक पालक बैठक आदी उपक्रमांबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना केल्या. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असेल तेथे ती वाढविण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी सभापती भोळे यांनी शासन , जिल्हा परिषद यांच्याकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा पालकांपर्यत पोहचण्याच्या सूचना करण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचास्तर वाढीस लागला असून काही शाळा डिजिटल करण्यात आले असल्याचे माहिती पालकांना देण्याची सूचना केली. शालेय पोषण आहार देतांना जेवढे विध्यार्थी तेवढाच आहार तयार करावा अन्यथा मुख्यध्यापकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सभापती भोळे यांनी दिला. ज्या शिक्षकांची मान्यता राहिलेली आहे त्यांना मान्यता देण्यात येईल. यासोबतच ज्या शिक्षणसेवक यांचा ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्याचा देखील आढावा १४ तारखेच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यासाठी शाळा निवडतांना योग्य तपासणी न करता चुकीची माहिती देण्याऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही सभापती भोळे यांनी दिला आहे.

 

 

 

 

 

Add Comment

Protected Content