कळमसरे येथे सामाजिक कार्यकर्ता रमेश चौधरी यांची अनोखी समाजसेवा !

607b7a38 b8e1 4012 9285 764d5f6e57a6

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रमेश चिंधा चौधरी यांनी आपल्या शेतात कपाशीची लागवड न करता ते पाणी पाईपलाईनद्वारे गावहाळासाठी उपलब्ध करून दिले आहे. गुरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.

 

समाजात काही माणसे आपल्या कर्तुत्वाने इतकी मोठी व आदरणीय होतात त्यामुळे तेच गावाचे भूषण व अलंकार बनतात. त्यांच्या कामामुळे तो समाज व गाव ओळखला जातो. आपल्या जीवनात जसे बोलले तसे वागणारे, नेहमी लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारे रमेश चौधरी यांनी गावात सध्या पाण्याची टंचाई असल्याने गुरांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

जनावरांना प्यायला पाणी नसल्याने त्यांचे हाल पाहून रमेश चौधरी यांनी आपल्या शेतातील विहिरीचे पाणी वळवून दत्त मंदिर चौकातील गावहाळ पाण्याने तुडुंब भरला. हाळात पाणी पाहून गुरेढोरे दुरून सैरावैरा धावू लागली आणि पशुपालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडू लागला.

Add Comment

Protected Content