भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर धारदार वस्तूने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तुकाराम वाडी येथे दोन जणांनामध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली तर एकाने हातातील धारदार वस्तूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी २ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रविवारी ३ डिसेंबर रोजी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अनिस हमीद शेख (वय-३२) रा. शिरसोली नाका, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी २ डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता अनिस शेख याचा मित्र अरूण गोसावी यांचे तुकाराम वाडी येथे काही मुलांसोबत भांडण सुरू होते. त्यावेळी सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी अनिस शेख हा गेला. याचा राग असल्याने संशयित आरोपी भल्ल्या (पुर्ण नाव माहित नाही) आणि सोबत अनोळखी दोन जणांनी शिवीगाळ व मारहाण केली. तर भल्ल्याने हातातील धारदार वस्तूने वार करून अनिस शेख याला जखमी केले. जखमी झालेल्या अनिस शेख याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. रविवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.

Protected Content