अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील लाल जैन मंदीर परिसरातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात बुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शहरातील लाल जैन मंदीर परिसरात असतांना रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास पिडीत मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. दरम्यान पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र काहीही माहिती मिळाली नाही. अखेर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.

Protected Content