खळबळजनक : अवैध सावकारीचा बळी; तरुणाने उचलला टोकाचा निर्णय

जळगाव/चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खाजगी सावकाराच्या जांचाला कंटाळून तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना चाळीसगाव शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात घडली आहे. या तरुणाच्या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल अशोक कोठावदे वय-२८, रा.शिक्षक कॉलनी, पालकर चौक चाळीसगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुल कोठावदे हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. १० जानेवारी २०१८ रोजी राहुल कोठावदे याने व्यवसाय करण्यासाठी अविनाश पाटील रा. मुक्तानंद नगर, चाळीसगाव याच्यासह इतरांकडून मोठ्या व्याजदराने पैसे घेतले होते. दरम्यान राहुल कोठावदे याने मुद्दलची फेड करून देखील त्याच्याकडून जास्तीचा पैसा मागण्यास सुरुवात केली. दरम्यान पैसे दिले नाही म्हणून राहुल याला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्रास देण्यास सुरूवात केली. या खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून राहुल कोठावदे याने ३० नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात किचनमध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान राहुलचे वडील अशोक रामदास कोठावदे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान मुलाच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या अवैधरित्या खाजगी सावकार म्हणून व्यवसाय करणारे अविनाश पाटील रा. मुक्तानंद नगर, सचिन उर्फ मनोज दिलीपराव चव्हाण रा. पाटीलवाडा, संजय नामदेव पाटील रा. एम.जे. नगर चाळीसगाव, कैलास बाजीराव पाटील रा.रांजणगाव ता. चाळीसगाव आणि अमोल मधुकर चौधरी रा. हुडको कॉलनी चाळीसगाव या पाच जणांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पाचही जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहे.

Protected Content