आंतरराष्ट्रीय आशिया सॉफ्टबॉल स्पर्धेत वैभव बारीची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मू.जे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव बारीची आंतरराष्ट्रीय आशिया सॉफ्टबॉल स्पर्धेत निवड नुकत्याच  अनंतपुर येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये निवड झाली.

 

याठिकाणी त्याने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तर 23 जून ते 28 जून 2023 दरम्यान कोची जापान येथे या स्पर्धा एशियन सॉफ्टबॉल फेडरेशन यांनी आयोजित केल्या आहे .वैभव दिलीप बारी इयत्ता १२ कला शाखेचा विद्यार्थी आहे.

 

खेळाडूंना मार्गदर्शन- डॉ रणजीत पाटील क्रीडा शिक्षक यांनी मार्गदर्शन केले . निवड झालेल्या खेळाडूचे के.सी. ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे,प्राचार्य डॉ स.ना. भारंबे, उपप्राचार्य के जी सपकाळे, पर्यवेक्षक आर बी ठाकरे , प्रा डॉ श्रीकृष्ण बेलोरकर, जिमखाना समिती चेअरमन प्रा.राजेश्री महाजन तसेच सर्व जिमखाना समिती सदस्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

स्पर्धा दि. 23 जून ते 28 जून 2023 दरम्यान कोची जापान येथे या स्पर्धा एशियन सॉफ्टबॉल फेडरेशन यांनी आयोजित  केल्या आहे.

Protected Content