डॉ.केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्‍त पर्यावरण संवर्धनासाठीचे विविध उपक्रम

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या दृष्टीने वृक्षलागवड हा उपक्रम हाती घेऊन बुधवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रत्येकी ३५ विविध वृक्षांची लागवड डॉ.केतकीताई पाटील यांच्याहस्ते केली जाणार आहे. तत्पूर्वी बुधवारी सकाळी ५.३० वाजता डॉ.केतकी पाटील ह्या ओंकारेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी जाणार आहे. त्यानंतर जळगाव शहरातील भास्कर मार्केट येथील निवास स्थानी सकाळी ६ ते ८ हितचिंतक व शुभेच्छूकांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.

त्यानंतर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. यात जामनेर तालुक्यातील नेरी येथे सकाळी ८.३०, जामनेर येथे १० वाजता, बोदवड येथे ११:३० वाजता, भुसावळ येथे दुपारी २, यावल येथे ३ वाजता व चोपडा येथे सायंकाळी ४.३० वाजता वृक्षारोपणाने डॉ.केतकीताईंचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. सायंकाळी ७ वाजेनंतर पुन्हा भास्कर मार्केट येथील निवास स्थानी हितचिंतक व आप्तेष्ठांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.

Protected Content