लाडशाखीय युवा मंच आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात

chalisgaon news 2

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्याने अनेक नामवंत खेळाडू घडविलेले आहे.क्रिडा क्षेत्रात सातत्य,जिद्द व मेहनत या त्रिसुत्रांचा अवलंब केला तर निश्चितच यश मिळते.क्रिडा क्षेत्राची आवड असणाऱ्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे जेणेकरुन आपले खेळात सातत्य राहण्यास मदत मिळते व सकारात्मकता वाढते व तरुण पीढीने खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे असे मत चाळीसगाव एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर यांनी लाडशाखीय युवा मंचच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेप्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी अध्यक्ष भूषण ब्राह्मणकर,उपाध्यक्ष डॉ.प्रवीण भोकरे,सचिव निरज येवले, सहसचिव अमोल नानकर आदी उपस्थित होते.

शहरातील लाडशाखीय युवा मंचच्या वतीने १३ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कॉस्को टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आपण आपल्या ध्येयाच्या जवळ क्रिडा क्षेत्र हे मन,मेंदू आणि मनगट सुदृढढ ठेवण्यास मदत करते.स्पर्धांच्या माध्यमातून जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते तर आपल्या आवडत्या खेळाविषयी लहानपणापासूनच आवड व अंगी जिज्ञासा असली पाहिजे.पालकांनी सुद्धा पाल्याच्या आवडत्या क्षेत्रात करियर करुन देण्यास प्रोत्साहन द्यायला हवे.सोशल मिडीयाच्या मायाजालात न अडकता मैदानावर या तरच शरीर चांगले ठेऊ शकू असे डॉ.विनोद कोतकर यांनी बोलतांना सांगितले

याप्रसंगी संदीप शिनकर,गणेश बागड,हिरालाल शिनकर, नरेंद्र शिरुडे, अमोल अमृतकर, मनोज चिंचोले,दिपक शिनकर, प्रशांत येवले, भूषण पिंगळे, कल्पेश पिंगळे, तुषार शिनकर, मिलिंद ब्राह्मणकर, महेश नाकवे, सुरेश येवले, जितेंद्र वाणी, सतीश देव, उदय धामणे, किरण कोठावदे आदी पदाधिकारी व खेळाडू तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र शिरुडे यांनी केले तर आभार गणेश बागड यांनी मानले.

Protected Content