सुरेश जैन यांचे तैलचित्र न काढणाऱ्या आयुक्तांवर कारवाई करा ; गुप्ता यांची मागणी

WhatsApp Image 2019 09 08 at 12.23.29 PM

जळगाव, प्रतिनिधी | मनपा सभागृहामध्ये असलेले घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांचे तैलचित्र काढण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी आयुक्त उदय टेकाळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे दिली होती. मात्र आयुक्त यांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई न केल्याने दीपककुमार गुप्ता यांनी ‘आपले सरकार पोर्टलवर’ नगर विकास विभागाकडे आयुक्त उदय टेकाळे यांच्या विरोधात तक्रार देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

नगर विकास विभगाकडे ‘आपले  सरकार, पोर्टलवर दीपककुमार गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीत  म्हटले आहे की, ३१ ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा न्यायालयाने घरकुल घोटाळ्याचा निकाल देतांना सुरेश जैन यांना  दोषी ठरवून त्यांना ७ वर्षाची शिक्षा व १०० करोड रुपयांचा दंड केला आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर ४ सप्टेंबर रोजी दीपक कुमार गुप्ता यांनी आयुक्त उदय टेकाळे यांना मनपा सभागृहात सुरेश जैन यांचे कोणताही ठराव न करता लावण्यात आलेले अवैध स्वरूपाचे तैलचित्र काढण्यात यावी अशी विनंती केली होती. परंतु, आजच्या तारखेपर्यंत मनपा आयुक्तांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने मनपा आयुक्त यांना सुरेश जैन यांचे तैलचित्र सभागृहातून हटविण्याचे आदेश देऊन त्यांच्यावर  नियमानुसार  योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती त्यांनी या तक्रारीत केली आहे.

Protected Content