बांगलादेश पहिला डाव १०६ धावांत संपुष्टात

teem

 

कोलकाता वृत्तसंस्था । पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे सुरुवातीपासूच चाचपडणाऱ्या बांगलादेशचा संघ पहिला डाव अवघ्या १०६ धावांत आटोपला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला असून त्यांच्यासाठी निर्णय फारसा उपयुक्त ठरला नाही.

कोलकात्यातील पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १०६ धावांवर संपवला आहे. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या त्रिकुटाने बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडत भारतीय संघाचे पारडं जड ठेवले आहे. इशांतने पहिल्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला. उमेश यादवने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेतले. बांगलादेशकडून सलामीवीर शादमान इस्लमा, अखेरच्या फळीत लिटन दास आणि नईम हसन यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. पहिल्या सत्रापर्यंत बांगलादेशचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात ७३ धावांपर्यंत मजल मारु शकला.

Protected Content