मोदी प्रचंड अहंकारी — नवाब मलिक

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोणाला किती अहंकार आहे हे लोक पाहत आहेत. आमचे लोक जमिनीवर असून भाजपाचा अहंकार लोकांनी पाहिला आहे   अहंकार कसा असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकत असल्याचा टोला  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे

 

नवाब मलिक यांनी यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना टोला लगावला. दरेकर जॅकेट घालून टीव्हीसमोर येतात. याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत असं ते म्हणाले आहेत. “प्रवीण दरेकर आरसा पाहून जॅकेट घालून येतात. आरशासमोर पाहून टीव्हीसमोर येतात. याला घेरणं म्हणत नाहीत. ही खालच्या पातळीवर जाऊन प्रसिद्धीसाठी करण्यात आलेली धडपड असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे. “काही विरोधी पक्षनेते तर कार्यालयात बसून केवळ प्रतिक्रिया देण्याचं काम करत आहेत,” असाही टोला त्यांनी लगावला.

 

विरारमधील दुर्घटनेवर बोलतान नवाब मलिक यांनी हे पालिकेचं किंवा शासकीय रुग्णालय नाही सांगताना चौकशीअंती सत्य बाहेर येईल असं म्हटलं आहे. खासगी रुग्णालयाच्या चुकीसाठी सरकारला दोष देणं योग्य नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Protected Content