जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरुणाला दुसर्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवार, दि.२० जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “जनार्धन जमनादास आगे (वय-२९) रा. कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ हे गुरुवार, २० जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीटी ७९९३) वरून शिरसोलीकडून जळगावकडे येत असताना समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ बीएस ९१४०) याने जोरदार धडक दिली.
या धडकेत जनार्दन आगे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान धडक देणारा दुचाकी चालक हा दुचाकी घेऊन पसार झाला होता. शुक्रवारी, २१ जानेवारी रोजी रात्री अज्ञात दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.