पिंप्राळ्यात जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केट परिसरात जुगार अड्ड्यावर रामानंदनगर पोलीसांनी छापा टाकून मुद्दमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी गुरूवारी २० जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर कारवाई करण्यात आला आहे.

 

जळगाव रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सोमाणी मार्केट जवळील भिंतीच्या आडोश्यात जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पो.कॉ.  रविंद्र चौधरी, पोहेकॉ सुशिल चौधरी, संजय सपकाळे, जुलाल परदेशी यांनी गुरूवारी २० जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कावाईत  सुनिल अंकुश सोनवणे (वय-४३) रा. कानळदा ता.जि.जळगाव याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुनिल सोनवणे यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.

Protected Content