जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीच्या अपघातात तरूण जखमी झाल्याची घटना सोमवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी साडेसात वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश बबन वहिते वय २२ रा. कंडारी ता. भुसावळ हा तरूण सोमवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्याचा मित्र गणेश परदेशी यांच्या सोबत दुचाकीने नशिराबाद उड्डाणपुलावरून जात असतांना समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएच २६८४) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर बसलेला गणेश परदेशी हा जखमी झाला. हा अपघात झाल्यानंतर जखमीला जळगावात खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी योगेश वाहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी साडेसात वाजता दुचाकीस्वारावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे हे करीत आहे.