दुचाकी अपघातात जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील निंबापूर रोडवर दुचाकीने जात असतांना दुचाकी घसरल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोहनसिंग चैनसिंग जाधव वय ४० रा. निंबापूर ता. खकनार मध्यप्रदेश असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातील रहिवाशी असलेला मोहनसिंग चैनसिंग जाधव हा गुरूवारी १९ जून रोजी दुपारी दुचाकीने जात असतांना त्यांची दुचाकी अचानक घसरली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र सुरवाडे हे करीत आहे.