जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना शिवराळ भाषेमधील संभाषणाचा निषेध करण्याकरता मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस जोडे मारून “जोडे मारो” आंदोलन” करून निषेध करण्यात आला.
काल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांना नाशिक जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने फोन करून विनंती केली की आपल्याकडे जिल्हा परिषद भरतीची जी फाइल आलेली आहे. त्या फाईलला त्वरित मंजुरी देऊन भरतीचा मार्ग मोकळा करावा जेणेकरून नोकरी अभावी मानसिकदृष्ट्या खचून गेलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळेल व रोजगाराची संधी देखील उपलब्ध होईल. परंतु ना. गिरीश महाजन यांनी फोन केलेल्या विद्यार्थ्याला अत्यंत खालच्या भाषेतील शिवराळ भाषेमध्ये तू फोन का केलास.. स तुम्हाला काही काम धंदे आहेत की नाही..? मी ती फाईल रद्द केली कुठल्याच प्रकारची भरती होणार नाही.. या पद्धतीची भाषा वापरली. त्यांच्या या वक्तव्याचा जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला. शहर अध्यक्ष मुजीब पटेल, जळगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुरली सपकाळे, अरुणा पाटील, रेखा पारधी, राकेश शिंपी सोनू पाटील, जयदीप पाटील, मुस्ताक खाटीक, आकाश पाटील, दिनेश बारी, भूपेंद्र भारंबे, रुपेश पाटील, तुषार पाटील आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.