शेंदूर्णीतील स्वच्छतेचा ठेका सत्ताधारी व अधिकाऱ्यांसाठी बनले चराऊ कुरण

 

 

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील सफाई माक्तेदाराकडे तुटपंजा कर्मचारी असतांना गावात नियमित सफाई होत नसतांना मक्तेदाराचे बिल नियमित अदा करण्यात येत असून यात पदाधिकारी , अधिकारी व  नगरसेवक यांना देखील वाटा दिला जात असल्याचे बोलले जात आहे.

 

शेंदुर्णी नगरपंचायत हद्दीत किती किलोमीटर रस्ते व किती मिटर गटारी आहेत त्यांची नगरपंचायतीकडे नोंद नाही, तसेच दररोज किती टन कचरा निघतो व त्याचे मोजमाप कोणत्या प्लेट काट्यावर होते त्याचीही नोंद नाही . मुख्य रस्ते व गटारी वगळता इतर गल्लीत २/२महिने रस्ते गटारी साफ होत नाही अशी गावकऱ्यांची माहिती नाही  नगरपंचायतीकडे दैनंदिन स्वच्छता होते की नाही हे पाहण्यासाठी यंत्रणा सुध्दा नाही.  पाणीपुरवठा अभियंत्यांना ही जबाबदारी दिली आहे.  किती टन कचरा निघतो व कोणत्या काट्यावर मोजला जातो याची  दैनंदिन माहिती नगरपंचायत कडे नाही. घनकचरा मोजण्यासाठी प्लेट  काटा नाही. मोजमापाच्या पावत्या नाहीत तर घनकचरा बिल कोणत्या आधारावर दिले जाते ? ठेकेदारकडे केवळ १० महिला व १० पुरुष इतकाच तुटपुंजा सफाई कर्मचारी वर्ग असतांना गावातील १७ वार्डातील ४० हजार लोकवस्तीच्या गटारी व रस्त्यांची स्वच्छता होते तरी कशी हा मोठा संशोधनाचा विषय आहे,.कारण दैनंदिन मुख्य रस्त्यांची सफाई ही कायम कर्मचाऱ्यांकडून केली जाते तर सृष्टी एंटरप्राइजेसच्या दैनंदिन स्वच्छता  ठेक्यातून सत्ताधारी नगरसेवक ,पदाधिकारी व अधिकारी यांना पोसण्याचे काम सद्या सुरू आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तक्रारदारांकडे फिरवी पाठ 

नगरपंचायत पदाधिकारी व अधिकारी व नगरसेवक यांना महिन्याकाठी  ठराविक रक्कम सृष्टी एंटरप्राइजेस कडून मिळत असल्याचे खाजगीत नगरसेवक सांगत आहे.  गेल्या २० महिन्यात पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार यांच्या संगनमताने नगरपंचायतला ५० लाखाचा चुना लावण्यात आला असल्याचा अंदाज आहे.  ज्यांना रक्कम मिळत नव्हती त्या नगरसेवकांनी आमदार गिरीश महाजन यांच्या कोर्टात हा विषय नेला होता पण आमदार गिरीश महाजन यांनीही स्थानिक नगरपंचायत कारभार पाहणाऱ्या नेत्यांनीच बाजू घेतल्याने दाल मे काला नसून सब दाल काली असल्याचा प्रत्येय तक्रारकर्ते नगरसेवकांना आला.  आता या नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनाही यात सहभागी करून घेण्यासाठी मागील मार्च महिन्यापासून कमिशन वृद्धी करून मिळावी म्हणून सत्ताधारी नेत्याने सृष्टी एंटरप्राइजेसकडे आग्रह धरला होता. त्यास कंपनीने नकार दिला होता,  नगरपंचायतने कंपनीचे बिल थांबविले होते त्यामुळे बिलच मिळत नसल्याचे म्हटल्यावर कंपनीनेही दोन दिवस स्वच्छतेचे काम थांबविले होते.  ठराविक तारखेला मिळणारी रक्कम मिळाली नसल्याने नगरसेवकांनी रक्कम मिळण्याची सत्ताधारी नेत्याकडे तगादा लावला होता. तसेच कमिशन वाढीची चर्चा गावात होऊ लागली म्हणून कंपनीचे मार्च महिन्याचे  थांबविण्यात आलेले बिल  ९/४/२१ रोजी सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरून अदा करण्यात आले आहे.

 

जळगाव वाॅॅॅॅटर ग्रेसची पुनरावृत्ती

येथील नगरपंचायत कडून सृष्टी एंटरप्राइजेस या कंपनीला दिलेला दैनंदिन साफसफाई ठेका म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सत्ताधारी पदाधिकारी व अधिकारी यांच्यासाठी चराऊ कुरण ठरत आहे,  जळगांव महानगर पालिकेतील बहुचर्चित वाटर ग्रेस कंपनी ठेक्यासारखेच प्रकरण शेंदूर्णी नगरपंचायत मध्ये सुरू आहे.  येथिल दैनंदिन स्वच्छतेचा ठेका गेल्या २० महिन्यापासून गंगापूर येथील सृष्टी एंटरप्राइजेस या कंपनीला देण्यात आला असून स्वच्छतेच्या नावाखाली ही कंपनी महिन्याकाठी लाखो रुपयांचे बिल नगरपंचायत तिजोरीतून उकळत आहे.

 

मागील २ महिन्यांपासून गल्लीबोळात गटारी व रस्त्याची सफाईची प्रतीक्षा 

मुख्य रस्ते सोडता गल्ली बोळातील गटारी व स्त्यांची सफाई २-२ महिन्यापासून झालेली नाही. त्यातच डासांच्या उत्पत्तीमुळे गावात तापाची साथ सुरू आहे.  ठेका देण्यात आला तेव्हा दिवसातून दोन वेळेस संपूर्ण गाव स्वच्छता व दैनंदिन गटर सफाई करण्यात येईल असे सत्ताधारी नेते आपल्या भाषणात सांगत होते. तसेच सुरवातीला स्वच्छतेच्या ठिकाणी हजेरी लावून खरोखरच गांव स्वच्छ ठेवण्यासाठी झटत असल्याचा आव आणत होते. परंतु नगरपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांना गाव स्वच्छतेशी देणे  घेणे नसून महिन्याकाठी मिळणाऱ्या ठराविक मलिदयासाठी ते झटत असल्याचे आता निदर्शनास येत आहे. येथील अधिकारी व पदाधिकारी यांना स्वच्छतेचा ठेका घेतलेली कंपनी दैनंदिन स्वच्छता करीत आहे की नाही हे न पाहताच बिले अदा करून नगरपंचायत हिता विरुद्ध कंपनी कडून आपला ठराविक हिस्सा उकळत स्वतःचे उखळ पांढरे करून घेत  आहे.

 

Protected Content