अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील कन्हेरे गावातील बोरी नदीच्या पात्रात वाळू भरू नका असे सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाला लोखंडी पावडा डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना आ ४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ७ जून रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात २ जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद छन्नू चव्हाण वय-२९, रा. कन्हेरे ता. अमळनेर हा तरुणाकुल परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून तो उदरनिर्वाह करतो. दरम्यान ४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता काहीजण गावातील बोरी नदी पात्रातून वाळू उपसा करत होते. त्यावेळी प्रमोद चव्हाण यांनी वाळू भरू नका असे सांगितले. या कारणावर सुरेश मुकुंदा गोलाईत आणि सागर मुकुंदा गोलाईत या दोघांनी लोखंडी फावडा डोक्यात टाकून प्रमोद चव्हाण याला जखमी केले ल. त्यामुळे त्याला तातडीने अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी ७ जून रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारे सुरेश मुकुंदा गोलाईत आणि सागर मुकुंदा गोलाईत दोन्ही रा. कन्हेरे ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहे.