जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लेंडी नाला येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका हमाली काम करणाऱ्या ३७ वर्षीय तरूणाला दोन जणांनी हमालीचा लोखंडी हुकने मारहाण दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणावर लोखंडी हुकने वार; दोघांवर गुन्हा दाखलकरून डोळ्याजवळ गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी १३ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
अधिक असे की, सुरज उर्फ विशाल अनिल सोनवणे वय ३६ रा. जुने जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून हमालीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी १३ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजता लेंडी नाला परिसरातून हमाली कामासाठी जात असतांना सोमेश ज्ञानेश्वर सोनवणे, राहूल रविंद्र कोळी दोन्ही रा. मेस्को माता नगर यांनी सुरज उफ विशाल याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.
दोघांना पैसे दिले नाही याचा राग आल्याने सामेश आणि राहूल यांनी हमालीसाठी लागणारा लोखंडी हुके वार करून गंभीर जखमी केले. तसेच कुणाला सांगितले तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमेश ज्ञानेश्वर सोनवणे, राहूल रविंद्र कोळी दोन्ही रा. मेस्को माता नगर या दोघांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल साळुंखे हे करीत आहे.