जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावातील पटेल वाडा येथे मौलानाचा पगार वाढविण्याच्या कारणावरून एकाला चार जणांकडून बेदम मारहाण करून डोक्यात लोखंडी पाईप टाकून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी १३ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी १४ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, मोहम्मद हनीफ शेख मुनाफ (वय-५२) रा. ममुराबाद ता.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मौलानाचा पगार वाढविण्यास विरोध का करतो असे सांगून संशयित आरोपी अरमान पटेल, समीर पटेल, समशेर पटेल आणि अफताब पटेल चौघे रा. ममुराबाद ता. जळगाव यांनी मोहम्मद हनीफ शेख मुनाफ याला शिवीगाळ करत लोखंडी पाईप डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना गावातील पटेल वाडा येथे रविवारी १३ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता घडली.
याबाबत सोमवारी १४ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणारे अरमान पटेल, समीर पटेल, समशेर पटेल आणि अफताब पटेल चौघे रा. ममुराबाद ता. जळगाव या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे हे करीत आहे.