तरूणासह आई व पत्नीला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल


अमळनेर लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील बोहरा गावात शेती विकली जात नसल्याच्या कारणावरून एका तरूणासह आई व पत्नीस शिवीगाळ व मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी ६ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १० मे रोजी दुपारी दीड वाजता मारवड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमोल प्रदीप कोळी वय २४ रा. बोहरा ता. अमळनेर हा तरूण आपल्या आई व पत्नी यांच्या सोबत वास्तव्याला आहे. अमोल कोळी यांच्यामुळे शेती विकली जात नाही या संशयावरून सचिन रामकृष्ण अहिरे, प्रतिभा संजय महाले, शोभाबाई रामकृष्ण अहिरे, रामकृष्ण तुकाराम अहिरे सर्व रा. बोहरा ता.अमळनेर यांनी अमोल याला आणि त्यांची आई व पत्नी यांना शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी अमोल कोळी याने मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सचिन रामकृष्ण अहिरे, प्रतिभा संजय महाले, शोभाबाई रामकृष्ण अहिरे, रामकृष्ण तुकाराम अहिरे सर्व रा. बोहरा ता.अमळनेर यांच्या विरोधात पोलीसात तक्रार देण्यात आली. पुढील तपास अमोल कोळी हे करीत आहे.