यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत कु. नेहा प्रमोद भोईटे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नेहाने ८८.३३% गुण मिळवून यावल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जळगाव जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री गोकुळ पाटील, संस्थेचे मानद सचिव निलेश रणजीतराव भोईटे, व्हाईस चेअरमन विरेंद्र भोईटे, संचालक महेंद्र भोईटे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. संध्या सोनवणे यांनी नेहाच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. डॉ. सुधीर कापडे, प्रा. मुकेश येवले, प्रा. संजय पाटील, प्रा. सी. के. पाटील, प्रा. राजीव तडवी, प्रा. सौ. सोनाली पाटील आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनीही नेहाचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कु. नेहा भोईटे ही शेतकी संघ यावलचे व्यवस्थापक संजय बाजीराव भोईटे यांची पुतणी आणि महाविद्यालयाचे कर्मचारी प्रमोद (छोटू) भोईटे यांची सुकन्या आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या कठोर परिश्रमाच्या बळावर मिळवलेल्या या यशाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे. विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी नेहा आणि तिच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे. नेहाच्या या यशामुळे महाविद्यालयाचे नाव तालुक्यात उज्ज्वल झाले आहे.