कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार

जळगाव प्रतिनिधी | शहरातील जळगाव औरंगाबाद रोड वरील असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर दुचाकीला पिकअप मालवाहू गाडीने जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कासमवाडी येथे राहणारा संदीप उत्तम चौधरी वय 29 हा तरुण आज मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच 19 डीएल 3707) ने घरी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू पिकअप व्हॅन ( एमएच 19 एस 9511) ने जोरदार धडक दिली. या धडकेत संदीप चौधरी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्याप्रमाणावर रक्तस्राव झाला होता त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस कर्मचारी सुधीर साळवे साईनाथ मुंडे व होमगार्ड ईश्वर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content