‘मराठा विद्याप्रसारक’मध्ये पुन्हा वादाची ठिणगी; तरूणावर हल्ला

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळात पुन्हा पाटील व भोईटे गटात वाद झाला असून यात एका तरूणावर हल्ला करण्यात आल्याची घटना रात्री घडली आहे.

रात्री पाटील व भोईट गटात वाद झाला. यात कल्पेश भोईटे यांच्या म्हणण्यानुसार तो रात्री साडेदाच्या सुमारास त्याची दुचाकी घेण्यासाठी नूतन महाविद्यालयाच्या परिसरात गेला होता. या वेळी त्याच्यावर काही तरुणांनी तलवारीने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. हा हल्ला विजय भास्कर पाटील, पीयूष पाटील आणि त्यांचे काही साथीदार यांनी केल्याचा आरोप देखील कल्पेशने केला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content