तलवार हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

रावेर प्रतिनिधी । महिलेस अश्‍लील बोलण्याच्या वादातून झालेल्या तलवार हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू देवराम चौधरी (वय-५५) रा. संभाजी नगर हा व्यक्ती काल रात्री तलवार हल्ल्यात जखमी झाला होता. त्याने एका महिलेस अश्‍लिल शब्द बोलण्याच्या कारणावरून संबंधीत महिलेचा मुलगा मुलगा रविंद्र संतोष मराठे रा. संभाजी नगर याने रागाच्या भरात तलवारीने राजू चौधरीवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले होते. ही घटना सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या राजू चौधरी यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात होते. दरम्यान, उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि शितल कुमार नाईक करीत आहे.

Protected Content