जळगावात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांचा डॉक्टरावर हलगर्जीपणाचा आरोप

suside

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका २७ वर्षीय युवकाचा आज दुपारी रुग्णालयात उपचारादरम्यान, अकस्मात मृत्यू झाला. परंतू डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मयत युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे घटनास्थळी तणावाचे निर्माण झाले आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, शहरातील तानाजी मालसुरे नगरात विनोद रघुनाथ भोळे (वय २७, धंदा, खाजगी वायरमन) यांना आज दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे घरच्यांनी त्यांना डॉ.मनोज टोके यांच्या नीलकमल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू दुपारी ३:४५ वाजता विनोद टोके यांचा उपचारादरम्यान अचानक मृत्यू झाला. परंतू डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे घटनास्थळी तणावाचे निर्माण झाले आहे. दरम्यान, डॉ,टोके यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मयत विनोद भोळे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन वर्षाची एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.

Protected Content