अवैध दारू वाहतूक करणार्‍या रिक्षासोबत आरोपी अटकेत

raver 1

 

रावेर प्रतिनिधी । अवैधरित्या दारूची रिक्षामधून वाहतूक करणाऱ्या दोघांना रावेर पोलिसांनी आज अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून दारुच्या 64 बाटल्यासह रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल जनार्धन बोनडे (वय-30) आणि कमलेश मोहनलाल गोगिया (वय-30) दोघ भुसावळ येथील राहणार आहेत. हे दोघ रिक्षा क्रमांक (MH19 CH 2716) मधून अवैधरित्या दारुची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो.नि.रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गफूर शेख आणि कॉ.पो.भागवत धांडे यांनी सापळा लावला असता आउट सावदा ते रावेर रोडवर बीजासनी माता मंदिर जवळ रिक्षा रोडवर सावदा कडून येतांना आढळून आली. रिक्षा दिसताच पोलिसांनी थांबून तपासणी केली तर रिक्षात 7 हजार 560 इंपेरियर ब्लु (180 ml)च्या 54 बाटल्या, 1हजार 500 मॅक्डोल व्हिस्की (180 ml)च्या 10 बाटल्या आढळून आल्या. कॉ.पो. भागवत धांडे यांचे फिर्यादवरून कलम 65(अ), (ई), 83 दारूबंदी कायद्या अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Protected Content