जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद शिवारात झाडाच्या फांद्या तोडत असताना अचानक खाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ४ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता घडली आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे. शनिवारी ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नान्या काका पावरा वय-३०, रा.दहिवद ता.शिरपूर ह.मु. म्हसावद ता.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, नान्या पावरा हा आपल्या कुटुंबासह जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे वास्तव्याला होता. शेती आणि मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ४ एप्रिल दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नान्या पावरा हा म्हसावद शिवारातील शेतात झाडाच्या फांद्या तोडत असताना अचानक तो खाली जमिनीवर कोसळला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मित्र सुरज पावरा यांनी त्याला तातडीने खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मयत घोषित केले. दरम्यान या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शनिवारी ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र मोरे करीत आहे.