लोखंडी रॉड, सळईने तरूणाला बेदम मारहाण; डोक्याला दुखापत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोण बुद्रुक गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला लोखंडी रॉड, सळई आणि लाकडी दांडक्याने डोक्यावर बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी २९ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली आहे. या संदर्भात सोमवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मारवड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नरेश महारु पाटील (वय-२९, रा. लोण बुद्रुक ता.अमळनेर) हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्या गावात राहणारे खंडेराव चुडामन पाटील, प्रशांत सुनील पाटील, संदीप खंडेराव पाटील, सुनील चुडामन पाटील सर्व रा. लोण बुद्रुक ता.अमळनेर यांनी किरकोळ कारणावरून शनीवारी २९ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता नरेश पाटील याला लोखंडी रॉड, सळई आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान यात जखमी झालेल्या नरेशला तातडीने अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार घेतल्यानंतर नरेश पाटील यांनी चौघां विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी खंडेराव चुडामण पाटील, प्रशांत सुनील पाटील, संदीप खंडेराव पाटील, सुनील चुडामन पाटील सर्व रा. लोण बुद्रुक ता. अमळनेर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहे.

Protected Content