Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये अहिराणीचा जागर: पाचव्या साहित्य संमेलनात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर!

अमळनेरमध्ये अहिराणीचा जागर: पाचव्या साहित्य संमेलनात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर!

0
100


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील पाचवं अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप अहिराणी भाषेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात येऊन रसिक प्रेक्षकांच्या मंजुरीने संपन्न झाला.

अहिराणी भाषेचा समावेश महाराष्ट्राच्या राजपत्रित भाषांमध्ये करावा, प्राथमिक स्तरावर मराठी अभ्यासक्रमावर अहिराणी भाषेची ओळख करून द्यावी. अहिराणी भाषेतील एक धडा मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात असावा. अहिराणी भाषेतील साहित्यकांसाठी स्वतंत्र पुरस्कार घोषित करावे. अहिराणी भाषेतील पुस्तके साहित्य व ऑडिओ बुकसाठी शासनाने स्वतंत्र अनुदान द्यावे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अहिराणी भाषा अभ्यास केंद्र सुरू करावे असे ठराव समारोपीय सत्रामध्ये अहिरानी बोलीतून आयोजन समितीच्यावतीने संयोजक प्रा.लिलाधर पाटील यांनी मांडले हे सर्व ठराव उपस्थितांच्यातर्फे हात वर करून मंजूर करण्यात आले.

अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी अमळनेरसह राज्यभरातील अहिराणी रसिकांनी अमळनेरच्या अहिराणी साहित्य संमेलनाला भरभरून प्रेम दिले अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी स्वागत अध्यक्ष डी डी पाटील ,कार्याध्यक्ष प्रा.अशोक पवार, संदिप घोरपडे,के डी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.मंचावर सचिव प्रभाकर शेळके, स्वागताध्यक्ष डॉ.डीगंबर महाले, मुख्य समन्वयक रणजित शिंदे, सौ.वसुंधरा लांडगे, प्रकाश महाले,गोकुळ बागुल,प्रकाश पाटील, रविंद्र पाटील आदिंसह मान्यवर उपस्थित होते, समारोपापूर्वी अहिराणी गौरव पुरस्कार अहिरानीतील विविध अभिनेते, कलाकार, रील स्टार, लेखक यांना देण्यात आले.

यावेळी मधुकर खैरनार नकाने, खान्देशी फॉरेनर अरुण सोनार, विजय जगताप धुळे, अरुण जाधव एरंडोल, विद्या भाटिया धुळे, वसंतराव पाटील अमळनेर, अहिराणी चित्रपट निर्माता गौतम शिरसाट नंदुरबार, विठ्ठल चौधरी, वंजारी कपाट, वनमाला बागुल पुणे, धनंजय चित्ते, ओम भोई अमळनेर, विश्राम बिरारी,समाधान बेलदार, अंजना बर्लेकर, पुणे,अशोक पाटील भडगांव आदिना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी कवी रमेश धनगर, कवी शरद धनगर यांनी सदर कार्यक्रमात आपल्या कवितांनी वेगळीच रंगत आणली.सूत्रसंचालन प्रा. डॉ.कुणाल पवार यांनी तर आभार बापुराव ठाकरे यांनी मानले.


Protected Content

Play sound