कारण नसतांना तरूणाला बेसबॉलच्या बॅटने बेदम मारहाण


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मामाजी टॉकीज परिसरात काहीही कारण नसतांना एका तरुणाला अज्ञात तीन जणांनी बेसबॉलच्या बॅटने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना २० जून रोजी घडली होती. या संदर्भात मंगळवारी २४ जून रोजी रात्री १०.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ शहरातील मामाजी टॉकीज परिसरात सागर संतोष ढोणे वय-२९ हा तरुण वास्तव्याला असून २० जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्याला काहीही कारण असताना अज्ञात तीन जणांनी तोंडाला रुमाल बांधून बेसबॉलच्या बॅटने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर मारेकरी हे दुचाकीवर बसून पसार झाले. जखमी झालेल्या सागर याला तातडीने खाजगीरणात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने मंगळवारी 24 जून रोजी रात्री साडेदहा वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद नेहमी करीत आहे.