किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण; जीवे मारण्याची धमकी!

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात किरकोळ झालेल्या वादातून एका तरुणाला गावातील तब्बल १६ जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवार १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. या संदर्भात गुरुवारी १७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता १६ जणांना विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात बुद्धभूषण भानुदास सोनवणे वय-३१ या तरुणाचे गावातील लताबाई सोनवणे आणि दीक्षा सोनवणे यांच्यासोबत बुधवारी १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता किरकोळ शाब्दिक वाद झाला. या वादातून गावात राहणारे महेंद्र दिलीप सोनवणे, लताबाई दिलीप सोनवणे, दीक्षा राजेंद्र सोनवणे, सुरेखा राजेंद्र सोनवणे, रेखाबाई प्रवीण सोनवणे, विनोद भागवत सपकाळे, ज्ञानदेव सोनवणे, रोहित प्रवीण सोनवणे, दीपक प्रवीण सोनवणे, भगवान आधार सोनवणे, वैशाली विनोद सपकाळे, वंदना जितेंद्र सोनवणे, रीता महेंद्र सोनवणे, दिलीप कौतिक सोनवणे, नितीन प्रकाश बाविस्कर आणि प्रवीण कौतिक सोनवणे सर्व राहणार ममुराबाद यांनी बुद्धभूषण सोनवणे याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केली आहे. या संदर्भात गुरुवारी १७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता बुद्धभूषण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे वरील १६ जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश चिंचोरे करीत आहे.

Protected Content