रेल्वे पोलीसांना चाकू दाखवून धमकी; तिघांवर गुन्हा दाखल

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील १५ बंगला भागात भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना ३ जणांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिसांना चाकू दाखवून धमकी दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी १६ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे. या संदर्भात गुरुवारी १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ आरपीएफमध्ये सहाय्यक फौजदार म्हणून काम करणारे लालाजी यादव हे आपल्या पथकासह बुधवारी १६ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता पेट्रोलिंग करत असताना भुसावळ शहरातील १५ बंगला भागात तीन जण संशयास्पद फिरत होते. त्यावेळी पोलिसांनी यातील रितिक निंदाने व देशमुख आणि एक अनोळखी व्यक्ती यांना जवळ बोलावले. यातील रितिक निंदाने याने रेल्वे पोलिसांना म्हणाले की “मै रेल्वे का लोहा चोरी करता हु तुम अपना काम करो” असे सांगितले. त्यानंतर देशमुख याने सांगितले की “तू भाई को जानता नही भाई ने मुक्ताईनगर के आमदार पर फायरिंग किया था” असे सांगितले. दरम्यान यातील एकाने चाकू काढून रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला धमकी देखील दिली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर सहाय्यक फौजदार लालजी यादव यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी रितिक निंदाने तसेच देशमुख नामक व्यक्ती आणि एक अनोळखी व्यक्ती अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल करीत आहे.

Protected Content